कपाशीचा हंगाम वाया गेल्याने कांडवेलच्या शेतकर्याची आत्महत्या
रावेर : पावसामुळे कपाशीचा हंगाम वाया गेल्याने विवंचनेत असलेल्या कांडवेल, ता.रावेर येथील 45 वर्षीय शेतकर्यानी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. निवृत्ती नारायण पाटील (45) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. शेतकर्याच्या मृत्यूने कुटुंबावर दिवाळीपूर्वी मोठे संकट कोसळले आहे. सततच्या पावसाने कपाशीचा हंगाम वाया गेल्याने आलेल्या नैराश्यातून कांडवेलच्या निवृत्ती पाटील यांनी कपाशीवर फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. मयत पाटील यांनी तीन एकरावर कपाशीची लागवड केली होती मात्र सततच्या पावसामुळे त्यांच्या शेतातील कपाशीचा हंगाम वाया गेल्याने ते काही दिवसां पासून नैराश्यात होते. घरातील सर्व सदस्य शेतात गेल्यावर त्यांनी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली. मयत शेतकर्याच्या पश्चात दोन लहान मुले आहेत.



