रावेर कृउबा निवडणूक : पंचायत समितीकडून याद्या देण्यास दिरंगाई


रावेर : रावेर कृषी उपन्न बाजार समितीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सहायक निबंधकांकडून मतदार याद्या मागविल्या जात आहे. ग्रामपंचायत मतदारसंघाची यादी निश्चित करण्यासाठी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना तालुक्यातील सदस्यांची नावे मागितली मात्र अद्याप पंचायत समितीकडून याद्या देण्यात आलेल्या नाहीत.

पं.स.कडून याद्या देण्यास दिरंगाई
रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याद्या निश्चित करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांची मतदार म्हणून नावे तसेच हमाल-मापाडी मतदारांची नावे सहा.निबंधक कार्यालयात प्राप्त झाली आहेत तर ग्रामपंचायत मतदारसंघातील चार उमेदवार येतात. त्यांना मतदार म्हणून ग्रामपंचायत सदस्य मतदान करतात.याद्या जमा करण्याची शुक्रवारी अखेरची तारीख होती परंतु पंचायत समितीकडून अद्याप ग्राम पंचायत सदस्याच्या याद्या देण्यात आलेल्या नाहीत. सहा.निबंधकांनी 4 रोजी याद्या संदर्भात पत्र दिले होते तर अखेरची तारीख 22 ऑक्टोबर होती परंतु अद्याप ग्रामपंचायत मतदार संघासाठी याद्या मिळाले नसल्याचे निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !