रावण दहन करण्यासाठी समाजाने शक्ती द्यावी


आमदार संजय सावकारे : भुसावळात जय मातृभूमी मंडळातर्फे रावण दहन कार्यक्रम

भुसावळ : रावण दहनानिमित्त मातृभूमी मंडळातर्फे दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम होतो व कार्यक्रम पाहण्यासाठी शहर व तालुक्यातील हजारो लोक येथे एकत्र येतात व त्यांच्या साक्षीने दरवर्षी रावणाचे दहन केले जाते. समाजातही अनेक वाईट प्रवृत्ती वाढल्या असून अशा प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी समाजाने शक्ती द्यावी, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. विजयादशमीनिमित्त मंगळवारी रात्री जय मातृभूमी मंडळातर्फे टी.व्ही.टॉवर मैदानावर रावणासह मेघनाथ व कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सावकारे यांनी मनोगत व्यक्त केले.

समाजातील रावणाच्या अंतासाठी राम जन्म घेणारच
आमदार सावकारे पुढे म्हणाले की, रावणाचा अंत करण्यासाठी प्रभू श्रीराम वारंवार बाण मारत होते मात्र पुन्हा एक एक मुंडकीच्या स्वरूपात रावण समोर येत होता मात्र प्रभू रामांना रावणाच्या अमृतकुपीचे रहस्य कळाल्यानंतर त्यांनी छातीत बाण चालवल्यानंतर रावणाचा अंत झाला. भुसावळ शहरातही काही रावण आहेत त्यामुळे आगामी काळात एकत्र येवू समाजाने विघातक शक्तीचा अंत करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. समाजात वेगवेगळ्या स्वरूपाचे रावण फिरत असतात मात्र त्यांच्या अंतासाठी राम जन्म घेत असतात, असेही ते म्हणाले.




आतषबाजी ठरली लक्षवेधी
याप्रसंगी रावणाचे दहन खासदार रक्षा खडसे तर मेघनाथाचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तसेच कुंभकर्णाचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते दहन करण्यात आले. याप्रसंगी विविध रंगी-बेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, किरण कोलते आदींनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
रावण दहन कार्यक्रमास नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, विजय चौधरी, राजेंद्र पुंडलिक चौधरी, राजेंद्र नाटकर, उद्योजक मनोज बियाणी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, किशोर पाटील, अ‍ॅड.निर्मल दायमा, रजनी सावकारे, संगीता बियाणी यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !