आमदार संजय सावकारे यांचा उद्या ग्रामीण भागात प्रचार दौरा
भुसावळ : भाजपाचे भुसावळ विधानसभा निवडणुकीतील आमदार संजय सावकारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गुरुवार, 10 रोजी ते ग्रामीण भागात प्रचार रॅली काढणार आहेत.
ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात
सकाळी आठ वाजता तालुक्यातील साकेगाव, 9.15 वाजता जोगलखेडा , भानखेडा तसेच 10 दहा वाजता ईदगाव व खडका, 11.30 वाजता किन्ही
तसेच 12.30 वाजता वेल्हाळा भागात प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या दौर्यात पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, जि.प.सदस्य पल्लवी सावकारे, पंचायत समिती सदस्य सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातील बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख प्रमुख कार्यकर्ते, सरपंच उपसरपंचांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



संत-महंतांचे घेतले आशीर्वाद
भुसावळ तालुक्याचे लाडके आमदार संजय सावकारे यांनी बुधवारी सावदा गुरुकुलला भेट दिली. याप्रसंगी स्वामी भक्तिकिशोर व स्वामी भक्तीस्वरूप महाराजांचा आशीर्वाद घेतले. त्यानंतर फैजपूर येथे महामंडलेश्वर जर्नादन महाराजांचा आशीर्वादही घेतला.

