!-- afp header code starts here -->

भुसावळ शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले


भुसावळ- भुसावळसह वरणगावातील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या दोघा रुग्णांवर शहरातील मातृभूमी चौकातील सनराईस हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अक्षय नरेंद्र भोळे (वय 23, माऊली नगर, भुसावळ) व अक्षद बापू चौधरी (21, अयोध्या नगर, वरणगाव) अशी या रुग्णांची नावे आहेत. दोघेही तरुण कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होते मात्र गावी आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर रक्तचाचणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ.राहुल जावळे यांच्या देखरेखाली त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !