भुसावळ हत्याकांड : मोबाईलसह रक्ताने भरलेला शर्ट जप्त


भुसावळ : पूर्व वैमनस्यातून भुसावळात घडलेल्या हत्याकांडात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तीन आरोपींना तासाभरात अटक करण्यात यंत्रणेला यश आले होेते. आरोपींना न्यायालयाने 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर बुधवारी हल्लेखोरांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली स्कुटी, रक्ताने माखलेला शर्ट आणि रक्ताने भरलेला मोबाईल तापी नदीकाठावरून पोलिसांना काढून दिले. हत्याकांडाच्या वेळी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली स्कुटी (एम.एच.19 ए.यु. 9654) चा शोध सुरू असताना पोलिस चौकशीत आरोपींनी वाहन लपवलेल्या ठिकाणाची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी दुपारी तपासाधिकारी तथा डीवायएसपी गजानन राठोड यांनी हल्लेखोरांना सोबत घेत रेल्वे फिल्टर हाऊस जवळील तापी नदीच्या परीसरातून गुन्ह्यातील स्कूटी तसेच राजा मोघे यांचा रक्ताने माखलेला शर्टही काढून दिला तसेच रक्ताने माखलेला मोबाईल एका बाजूला लपवून ठेवलेला मोबाईलदेखील जप्त करण्यात आला. दरम्यान, शासनाच्या नागरी हक्क संरक्षण कायदा समितीच्या पथकातील डीवायएसपी बी.बी.कातडे, प्रकाश सपकाळे, राजू पवार आदी जणांनी उपअधीक्षक राठोड यांची भेट घेत माहिती जाणून घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !