आमदार संजय सावकारेंनाच पुन्हा संधी : ग्रामीण भागातील मतदारांचा विश्‍वास


भुसावळ तालुक्यात प्रचार रॅलींना प्रतिसाद : मतदारांनी औक्षण करून दिले आशीर्वाद

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे आमदार संजय सावकारे यांनी गुरुवार, 10 रोजी तालुक्यातील साकेगाव, जोगलखेडा, भानखेडा भागात जोरदार प्रचार रॅली काढली. यावेळी ठिकठिकाणी आमदारांचे सौभाग्यवतींनी औक्षण करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. सलग तिसर्‍यांदा सावकारे हॅट्रीक साधतील, असा विश्‍वासही यावेळी मतदारांकडून त्यांना दिला जात आहे.

दिराच्या विजयासाठी वहिनींनी खोचला पदर
सलग दोन टर्मपासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी मोठे बंधू प्रमोद सावकारे यांनी रात्रीचा दिवस केला आहे तर दुसरीकडे त्यांच्या मोठ्या वहिनी तथा जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारेंनी देखील प्रचारात आघाडी घेतली असून दिराला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील प्रचार रॅलीत पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र साहेबराव चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, गोलू पाटील, भालचंद्र पाटील, साकेगाव सरपंच अनिल पाटील, चुडामण भोळे, आनंद ठाकरे, प्रशांत पाटील, दिलीप कोळी, वसंतराव झारखंडे, महाजन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा पदाधिकार्‍यांकडूनही जोमात प्रचार
आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी भुसावळ शहर व तालुका भाजपातील सर्वच पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !