जळगावात उपनिरीक्षकाला धक्काबुक्की : तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक


डीजे बंद करण्यास सांगितल्याचा राग : पोलिसांना दिली धमकी

जळगाव : जाकीर हुसेन कॉलनीत मॉ नवदुर्गा उत्सव मित्र मंडळातर्फे डी.जे वाजवून दांडीया सुरू असताना रामानंदनगर पोलिसांनी डीजे बंद करण्यास सांगितल्याचा राग आल्याने उपनिरीक्षकांना महिलेसह दोघांनी अरेरावी तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकार 8 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली.

डीजे बंद करण्यास सांगितल्याने राग अनावर
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांच्यासह पोलीस नाईक विजय खैरे, ज्ञानेश्‍वर कोळी व वाहनचालक संतोष पाटील यांचे पथक 8 रोजी गस्त उशीरापर्यंत सुरु असलेल्या सार्वजनिक मंडळाची पाहणी ते बंद करण्याकामी गस्त घालत होते. पथकाने शिवकॉलनी, पिंप्राळा, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर, रामानंद नगर, काव्य रत्नावली चौक, रोटरी क्लब भवन येथील दुर्गादेवी मंडळे बंद करुन रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जाकीर हुसेन कॉलनी येथे गेले. जाकीर हुसेन कॉलनी येथे मॉ नवदुर्गा उत्सव मित्रमंडळातर्फे 11.30 वाजेच्या सुमारास बंद असतांनाही डी.जे. लावुन दांडीया सुरु होता. 10 वाजेची परवानगी तसेच डी.जे. बंदी असल्याने पोलिसांनी विनोद तायडे यांना डी.जे. बंद करुन दांडीया बंद करा असे सांगितले असता, विनोद तायडे याने उलट कर्मचार्‍याला अर्वाच्च भाषा वापरुन तुमच्याकडून जे होईन ते करा असे सांगितले. अर्वाच्च भाषा वापरल्याने विनोद तायडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस वाहनात बसवून घेवून जात असतांना विनोदची आई नलिनी तायडे व भाऊ सतीश तायडे यांना आरडाओरड केली व दोघेही वाहनासमोर आडवे झाले. नलिनी तायडे यांनी पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांचा हात ओढून माझ्या पोराला सोड नाही तर तुला जावू देणार नाही, असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरड केला. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे यांच्या फिर्यादीवरुन या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तिघांपैकी विनोद तायडे यास पोलिसांनी अटक केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !