चोरवडमधून गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
भुसावळ : तालुक्यातील चोरवड येथे एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीताला अटक करीत त्याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. विजय मन्नू उजलेकर (23, रा.72 खोली, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार अनिल इंगळे, सुरेश महाजन, सुनील दामोदरे, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे आदींच्या पथकाने केली.

