फैजपूरात अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन


फैजपूर : शहरातील सावदा रोड, एकता ट्रान्सपोर्ट येथे नुकतेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुसावळसह यावल व रावेर तालुक्यातील सर्व समाजातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी माजी आमदार चौधरी व उमेदवार चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक कुर्बान शेख, माजी नगरसेवक सभा पठाण, शहादूर तडवी माजी, उपनगराध्यक्ष बापू कापडे, विलास काठोके, शिवसेनेचे नगरसेवक अमोल निंबाळे तसेच अन्वर खाटीक, ईश्वर इंगळे तसेच बिस्मिल्ला शहा, निसार पठाण, कामील पहेलवान, कामील शेख, फारुक शेख अब्दुल्ला भास्कर तेली, माजी पोलीस भास्कर तेली, बंटी मंडवाले, सुरेश तेली, राजु पाहुणे तसेच माजी नगरसेवक भरत बाविस्कर, सलीम तडवी आदींची उपथिस्ती होती.

अनेक विकासकामे केली -माजी आमदार चौधरी
माजी आमदार संतोष चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की येथील यावल-रावेर मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून तरुण तडफदार उमेदवार रावेर अनिल चौधरी हे अपक्ष म्हणून उभे आहेत शिवाय त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. प्रसंगी चौधरी यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !