भुसावळातील अपक्ष उमेदवार यमुनाबाई रोटेंना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यमुनाबाई दगडू रोटे यांनीही प्रचार दौर्यांना प्रारंभ केला असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी सुरू केल्या असून आतापर्यंत भुसावळ शहर व ग्रामीण भागात त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. या प्रचार दौर्यात त्यांच्यासोबत स्वप्नील सरोदे, भूषण कोल्हे, जीवन पाटील, जीवन वारके, प्रशांत वारके आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

