जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांना भोरगाव लेवा पाटीदार पंचायतीचा पाठिंबा


जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांना भोरगाव लेवा पंचायत ठाया , पाडळेच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला. जळगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे उमेदवारी यांना जाहीर झाल्यानंतर भोरगाव लेवा पंचायत ठाया, पाडळसेच्या वतीने जाहीर पत्रक काढून पाठिंबा देण्यात आला आहे. समाजाच्या विकास उन्नतीकरीता आमदार राजूमामा भोळे ह्यांना भरगोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया, पाडळसे यांच्या वतीने लेवा पाटीदार समाजाला करण्यात आले आहे, यावेळी पाठिंबा देताना कुटुंबनायक रमेश विठू पाटील , कुलसचिव अ‍ॅड.संजय राणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !