आमदार हरीभाऊ जावळेंच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदारसंघात सुवासिनींनी केले औक्षण : प्रचाराचा झंझावात कायम
रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार हरीभाऊ जावळे यांनी शुक्रवारी तालुक्यातील मोरगाव, नेहता, खिरवड, निंभोरासीम, पुनखेडा आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्यानंतर मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. प्रचार रॅलींना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रचार रॅलींचे जोरदार स्वागत
भाजपा, शिवसेना, आर.पी.आय.(आठवले गट) शिवसंग्राम, रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार हरीभाऊ जावळे यांनी शुक्रवारी रावेर तालुक्यात प्रचार केला. प्रत्येक गावामधे जावळे यांच्या रॅलींना प्रतिसाद मिळाला.
यांचा होता सहभाग
यावेळी सुरेश धनके, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोळे, पी.के.महाजन, रंजना चौधरी, योगीता वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, पवन चौधरी, संदीप सावळे आदींची उपस्थिती होती.
कोळवदसह मोरगावाही प्रचार फेरी
कोळवद तसेच मोरगावात निघालेल्या प्रचार फेरीत जिल्हा परीषद सदस्य रंजना पाटील, प्रल्हाद पाटील, आशिक पिंजारी, सुधाकर पाटील, सुरेश धनके, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गोपाळ नेमाडे, पवन चौधरी, अटवाड्यात गणेेश धनायते, सुनील महाजन, अशोक अग्रवाल,रमेश पाटील,भास्कर कुयटे, पांडूरंग कुयटे, पिंंटू पाटील, लक्षणं बोरसे, पातोडीत मोहन बोरसे, लक्ष्मण सावळे, ब्रिजलाल सावळे, दौलत काचरे, भगीरथ कोळी, उमेश कोळी, वसंत ढाकणे, पूनखेेडा येेेथे उमेश सवळे, आकाश सपकाळे, विनोद कोळी, सुभाष पाटील, मनोज पाटील, मनोहर सावळे, रमेश चौधरी, प्रकाश रायमले, गिरीष पाटील,नामदेव कोळी,गणेश पाचपोहे,भैया सावळे,प्रकाश चौधरी, निंभोरासीम येथे नंदकिशोर चौधरी, अनंत पाटील, लक्ष्मण पाटील, रामकृष्ण महाजन, डॉ.भास्कर चौधरी, विकास पाटील, गोकुळ चौधरी, ताराचंद चौधरी, नारायण चौधरी, राघो चौधरी, कैलास पाटील, नगीनलाल सवरणे, विश्वनाथ सावरणे, सुभाष चौधरी, लक्ष्मण पाटील, समाधान पाटील आदींची उपस्थिती होती.

