भुसावळातील सुवासिनींनी औक्षण करीत आमदार संजय सावकारेंना दिले आशीर्वाद
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय वामन सावकारे यांनी शुक्रवारी भुसावळ शहर व तालुक्यात प्रचार रॅली काढली. शहरातील सुवासिनींनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. प्रभाग क्रमांक 10 मधील लक्ष्मी नारायण मंदिरात श्रीफळ फोडून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. राम मंदिर वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्ड, सराफ बाजार, न्यू एरीया वॉर्ड, ओंकारेश्वर मंदिर भागात प्रचार रॅली काढण्यात आली.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीत माजी नगराध्यक्ष व नगरसेवक युवराज लोणारी, शहर भाजपाचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, देवेंद्र वाणी, नगरसेवक प्रा.दिनेश राठी, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, मेघा वाणी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, शिवसेनेचे नमा शर्मा, पिंटू कोठारी, राजू नाटकर, दिनेश नेमाडे, बापू महाजन, अॅड.बोधराज चौधरी, बापू महाजन, गिरीश महाजन, पिंटु ठाकुर, निक्की बत्रा, किरण कोलते, राजु आवटे, वासुदेव बोंडे, नीळकंठ भारंबे, बबलू बर्हाटे, अॅड.श्याम गोंदेकर, संजय फालक, जगू खराडे, सुमित बर्हाटे, अनिकेत पाटिल, लल्ला देवकर, अलका शेळके, हेमंत खंबायत, गोकुळ बाविस्कर, नारायण रणधीर, सचिन नवगाळे, गिरीश चौधरी, मंगेश यावलकर, युवा अंबोले, रुपेश चौधरी, सागर भारंबे आदी सहभागी झाले.

