तळवेलसह भुसावळ ग्रामीणमध्ये आमदार संजय सावकारेंच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद


भोरगाव लेवा पंचायतीचे कुटूंबनायक रमेश विठू पाटील यांनी घेतली भेट : अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी भुसावळ तालुक्यातील तळवेलसह परीसरातील गावांमध्ये प्रचार रॅली काढली. याप्रसंगी मतदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तर सुवासिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. दरम्यान, भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी तळवेलमध्ये आमदार संजय सावकारे यांची भेट घेतली. समाजाने अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !