महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकरेंना वरणगाव शहरातून प्रचंड मताधिक्य देणार


नगराध्यक्ष सुनील काळे : वरणगावात घेतली नियोजन बैठक

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयभाऊ सावकारे यांची शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निवडणूक नियोजनार्थ पहिली बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष काळे यांनी आमदार संजय सावकारे यांना वरणगाव शहरातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही देत कार्यकर्त्यांना झटून कामाला लागण्याचे आवाहन केले.

वरणगावात घेतली बैठक
भाजप महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत वरणगावात झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष सुनील काळे, प्रा.जतीन मेढे, हाजी अल्लउद्दीन सेठ, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, राजेंद्र चौधरी, अजय पाटील, ज्ञानेश्वर घाटोळे, साजीद कुरेशी, इरफान भाई पिंजारी, शहराध्यक्ष सुनील माळी, प्रल्हाद सोनार, नामदेव पहेलवान, प्रकाश चौधरी, रामदास दादा माळी आदी उपस्थित होते.




कार्यकर्त्यांची मेहनत फळाला येणार 
आमदार सावकारे म्हणाले की, वरणगाव शहरात विकासाची कामे वेगवान सुरू असून निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मेहनत निश्‍चित फळाला येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

एकदिलाने झटून कामाला लागा -नगराध्यक्ष काळे
नगराध्यक्ष काळे म्हणाले की, पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशाचे पालन करायचे असून आमदार सावकारे यांना प्रचंड मताधिक्य वरणगाव शहरातून मिळवून देण्यासाठी झटून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी हितेश चौधरी, सचिन मेथाळकर, आकाश निमकर, कुंदन माळी, तेजस जैन, सोहेल कुरेशी, किरण धुंदे, अमित सोनार, अतुल पाखरे, यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !