रावेरातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या विजयासाठी सौभाग्यवतींनी खोचला पदर
फैजपूरात होम टू होम प्रचार जोमात ः मतदारांचे घेतले आशीर्वाद
फैजपूर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी शहर व तालुक्यात प्रचारास वेग घेतला आहे शिवाय त्यांच्या सौभाग्यवती ललिता अनिल चौधरी यांनीदेखील प्रचारात आघाडी घेतली आहे. शनिवारी फैजपूर शहरातील विविध भागात त्यांनी होम टू होम प्रचार करीत मतदारांचे आशीर्वाद घेतले.
यांचाही प्रचारात सहभाग
ललिता अनिल चौधरी यांच्यासह नगरसेविका कविता चौधरी, सुरेखा मंदवाडे, हर्षा चौधरी, नंदिनी चौधरी, राणी पगारे, रेणुका पवार, माया मंडवाले, आरती काठोके, विजया चौधरी, उज्वला चौधरी, शारदा मंडवाले व इतर महिला माता भगिनी सहभागी होत्या.


