बिजासन घाटात तिहेरी अपघात: तीन जण जण गंभीर जखमी

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका : ट्रक अनियंत्रीत झाल्याने अपघात


शिरपूर : राष्ट्रीय महामार्गावरील राज्य सीमेवर बिजासन घाटात उतारावर रात्री उशिरा ट्रक अनियंत्रित झाल्याने पुढे चालणार्‍या दोन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला व या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना महामार्ग अम्ब्युलन्सने रुग्णालयात उपचारासाठी सेंधवा येथे हलविण्यात आले.

ट्रक अनियंत्रीत झाल्याने अपघात
मुंबई आग्रा महामार्गावरील राज्य सीमेवरील बिजासन घाटात रात्री उशिरा उतारावरून शिरपूर च्या दिशेने येणार्‍या एक ट्रक अनियंत्रीत झाला आणि चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे चालणार्‍या एका कंटेनर आणि कारला एकामागून एकाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात ट्रक चालक कंटेनर व कार या वाहनातील नरेश रंजित व विकास कैलाश (दोघे रा. झुंझुनू) आणि अजय गोनू राय (रा.मुझफ्फरपूर) हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना महामार्ग अम्ब्युलन्सने सेंधवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

ट्रक चालक कॅबीनमध्ये अडकला
या भीषण अपघातात ट्रक चालक ट्रकमध्ये अडकला होता त्यास पोलीस व ग्रामस्थांनी अथक परीश्रम करून बाहेर काढले मात्र अपघातानंतर नेहमी उशिरा येणारी महामार्ग अम्ब्युलन्स यावेळी देखील यावेळी उशिरा आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. महामार्गावरील बिजासन घाटात वारंवार अपघात होत असल्याने बिजासन चौकीवर हायड्रॉलीक वाहन व रुग्णवाहिका वाहन उभे करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे मात्र जबाबदार अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !