रावेर विधानसभा : निवडणूक खर्च सादर न करणार्‍या पाच उमेदवारांना नोटीसा


रावेर : रावेर विधानसभेतील निवडणूक लढविणार्‍या पाच उमेद्वारांनी निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्यामुळे पाच उमेद्वारांना नोटीस पाठवून 24 तासांची मुदत देण्यात आली आहे अन्यता कारवाई करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. भारत निवडणूक आयोग निवडणूक खर्च नियंत्रण अनुदेशानुसार रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक प्रचार खर्चाबाबत दुरध्वनी संदेश देवून निवडणूक खर्च हिशोब नोंदवही तपासणी कामी निवडणूक खर्च निरीक्षक यांचे तपासणीकामी बोलवण्यात आले मात्र विवेक ठाकरे, संतोष मधुकर ढिवरे, गयासउद्दीन सदरोद्दीन काझी, राजाराम माधव सोनार व हाजी मुश्ताक सैय्यद कमरोद्दीन हे पाच उमेद्वार अनुपस्थित राहिले. या पाच उमेदवाराांनी निवडणूक आयोगाच्या प्राप्त सुचनांची अवहेलना केल्याचे निदर्शनास आले आहे. पाचही उमेद्वारांनी 24 तासाच्या आत विना विलंब खर्च सादर करावा,मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 77 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटीसीत बजावण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !