भुसावळसह तालुक्यातील राजपूत समाजबांधवांचा आमदार संजय सावकारेंना पाठिंबा
भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार व आमदार संजय सावकारे यांना शहर व तालुक्यातील राजपूत समाजबांधवांनी पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी खडका एमआयडीसीत समाजबांधवांची बैठक झाली. यात पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग ठाकूर) यांनी दिली. आमदार संजय सावकारे यांनी राजपूत समाजाकरीता सामाजिक सभागृह व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून वसंत टॉकीज परीसरातील मुख्य चौकास राणा प्रताप सिंह यांचे नाव दिल्याने त्यांच्या कामगिरीची दखल घेत राजपूत समाजाने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविल्याचे ठाकूर म्हणाले. दरम्यान, या बैठकीला भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारेदेखील उपस्थित होते. दरम्यान, यावेळी काँग्रेसचे ठाणसिंग पाटील व ओझरखेड्याचे प्रकाश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
राजपूत समाजबांधवांच्या बैठकीस भुसावळातील नगरसेवक पिंटू ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, संजय सुरजसिंग पाटील, कन्हाळा सरपंच राजू पाटील, ओझरखेड्याचे ठाणसिंग पाटील, ओझरखेडा सरपंच विकाससिंग पाटील, शिंदीचे नवलसिंग राजपूत, कंडारीचे यशवत चौधरी, साकेगावचे दिलीपसिंग पाटील, संदीपसिंग राणा, बोहर्डीचे सुनीलसिंग पाटील, खेडीचे भैय्या महाजन, खंडाळा सरपंच नितीन पाटील, ओझरखेड्याचे किरण राजपूत, दामोदरसिंग राजपूत, अभिजीतसिंग राजपूत, कंडारीचे नितीन पाटील, पप्पू चौधरी, कंडारीचे देविदास भोळे, खंडाळ्याचे नितीनसिंग पाटील, शिवपूर कन्हाळेचे राजू मेहरे, खेडीचे वामनसिंग पाटील तसेच शहर व तालुक्यातील सातशेवर समाजबांधव उपस्थित असल्याचे नगरसेवक ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, भुसावळ कृउबाचे उपसभापती अशोक पंडित पाटील यांनी मात्र आपला पाठिंबा नसल्याचे कळवले आहे.



