भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी केले अभीष्टचिंतन : सोशल मिडीयातून शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ : भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र वर्गासह चाहत्यांकडून 47 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळच्या पत्रकारीतेत कार्यरत असलेले संजयसिंग चव्हाण हे शहरच नव्हे संबंध जिल्हाभरात परीचित आहेत. रोखठोक व सडेतोड लिखाणाच्या शैलीमुळे खरेतर चव्हाण सार्यांनाच परीचीत आहेत. कोजागिरी पौर्णिमेसोबत रविवारी आलेला त्यांचा वाढदिवस म्हणजे मित्र मंडळींसाठी दुग्धशर्करा योगच. सकाळपासून मित्र परीवारासह त्यांचे चाहते व हितचिंतकांनी त्यांच्यावर सोशल मिडीयातून तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले.
लोकप्रतिनिधींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातून ज्येष्ठ पत्रकार चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रविवारी सकाळी व्यापारी गुड्डू अग्रवाल, वसंत झारखंडे, पवन बुंदेले, राजेंद्र नाटकर, किरण चोपडे, रमाशंकर दुबे यांनीही त्यांची भेट घेत त्यांचे अभीष्टचिंतन केले.

