पावसाने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले ; 12 एक्स्प्रेस धावताय विलंबाने


मुंबईत संततधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना फटका ; गुरुवारी तीन एक्स्प्रेस रद्द

भुसावळ- मुंबईतील पावसामुळे सलग चौथ्या दिवशीगुरूवारी कुर्ला वाराणशी सुपरफास्ट, पवन एक्स्प्रेस व कुर्ला हावडा समरसता एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाऊन मार्गावरील तब्बल 12 प्रवासी रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. आधीच दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून त्यातच गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तब्बल 12 गाड्या विलंबाने
अप मार्गावरील विलंबाने धावणार्‍या गाड्यामध्ये नवजीवन एक्सप्रेस आठ तास, ताप्ती गंगा एक्स्प्रेस पाच तास, महानगरी एक्स्प्रेस एक तास, गोदान एक्स्प्रेस चार तास, गीतांजली एक तास, कामायनी एक्स्प्रेस तीन तास तर डाऊन मार्गावरील कुर्ला भागलपूर एक्स्प्रेस अर्धातास, वास्को पटना एक्स्प्रेस पाच तास, गोवा एक्स्प्रेस सहा तास, महाराष्ट्र एक्स्प्रेस तास तास, यशवंतपूर चंदीगड एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होत्या.


कॉपी करू नका.