जनसेवेसाठी मतदारांनी द्यावी संधी -अनिल चौधरी
रावेर तालुक्यातील विवर्यात कॉर्नर सभा : मतदारांकडून प्रतिसाद
रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी रावेर तालुक्यातील विवरा येथे रविवारी कॉर्नर सभा घेत मतदारांशी संवाद साधला. जनसेवेसाठी मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी प्रसंगी केले. दरम्यान, चौधरी यांनी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत प्रचार रॅल्या काढल्या असून मतदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे शिवाय सुवासिनींकडून त्यांचे औक्षण केले जात आहे.
विवर्यातील सभेला यांची उपस्थिती
विवरा गावात झालेल्या कॉर्नर सभेला भैय्या पाटील, अहमद मुक्तार, विकास पाटील, ज्ञानेश्वर कुंभार, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक कुर्बान शेख, यावलचे आलीम शेख यांच्यासह विवरा ग्रामस्थांची उपस्थिती होती.


