भुसावळ विभागात महर्षि वाल्मीक जयंती उत्साहात
विविध कार्यक्रमांचे आयोजन : भुसावळ शहरासह सुनसगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळ : भुसावळ शहरासह विभागात महर्षि वाल्मीक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच मनोगतात महर्षि वाल्मीकींबद्दल माहितीही दिली.
भुसावळात जयंती उत्साहात
कोळी समाजाचे भूषण महर्षी वाल्मिकींनी श्री रामांच्या जन्माआधी रामायणाची रचना आपल्या दिव्य दृष्टीतून केली. रामायणासारखा दिव्यग्रंथ त्यांनी विश्वाला अर्पण केला. या ग्रंथाद्वारे नव समाजाची निर्मिती बंधू प्रेम, एक पत्नी व्रत, पितृ आज्ञेचे पालन, सदाचाराची शिकवण त्यांनी सर्व मानव जातीला दिली. अशा या थोर महात्म्याच्या जीवनाद्वारे मानव जातीला दिव्य प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाजन यांनी केले. शहरातील कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित जयंती कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.



यांची होती उपस्थिती
प्रसंगी व्यासपीठावर शांताराम सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, रवींद्र बाविस्कर, भागवत सपकाळे, प्रदीप सपकाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, धर्मराज कोळी, महारु कोळी, गोकुळ सपकाळे, प्रदीप सोनवणे, दिलीप कोळी, दीपक सोनवणे, कार्तिक सोनवणे, चंद्रकांत सपकाळे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मूर्ती पुजन करण्यात आले. समाज वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी येथील कोळी मंगल कार्यालयात समाजाचा वधू-वर मेळावा होणार असल्याची व त्यासाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. सूत्रसंचालन प्रदीप सपकाळे तर आभार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मानले.
सुनसगावात जयंती उत्साहात
सुनसगाव- ग्रामपंचायत कार्यालयात महर्षि वाल्मीक जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य एस.आर.पाटील, सुनील कंकरे, शामराव मालचे, भास्कर पाटील, ग्रामसेविका रत्नमाला घुले तसेच कोळी समाज कार्यकर्ते कृष्णा कोळी, बाळू कोळी, बिंदूबाई कोळी यांनी प्रतिमा पूजन केले. त्याच प्रमाणे अनिल सपकाळे, कमलाकर कोळी, सोमा कोळी, सुनील कोळी, अनिल कोळी यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी गलू धर्मा कोळी, चेतन कोळी, सागर कोळी, सागर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सपकाळे, दीपक सुरेश भोळे, उल्हास टेलर, गणेश चिंचोरे तसेच रामकृष्ण ढाके, रोहिदास पाटील, सचिन शिरोळे, राहुल कोळी, अनिल वेडू पाटील, महेश भोळे, रेवा कंकरे, जितेंद्र काटे व असंख्य कोळी बांधव उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.
