मुक्ताईनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरटा


मुक्ताईनगर : शहरातील आदर्श इंग्लिश मिडीयम समोरील रहिवासी तथा वीज महावितरणचे सहाय्यक अभियंता आशिष कुंभारे यांची दुचाकी (एम.एच.29 एपी 0484) ही घरासमोर लावलेली असतांना बुधवार, 5 जानेवारी रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान चोरताना मयूर सुकलाल पराळकर (भिलवाडी, मुक्ताईनगर) यास सतर्क ग्रामस्थांनी पकडले होते. आरोपीला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरोधात अभियंता कुंभारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !