बदलत्या काळातही मुद्रीत माध्यमे विश्वासार्हता टिकवून
पत्रकार दिन कार्यक्रमात आमदार संजय सावकारे : समाज माध्यमांनी जागल्याची भूमिका वठवावी
भुसावळ : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते कारण दिन, दलित, शोषित, वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी माध्यमे झटत असतात व तलवारीने जो इतिहास घडवला नाही तो लेखणीने घडवला आहे. काळ कितीही बदलला असलातरी इलेक्ट्रॉनिकऐवजी प्रिंट माध्यमांनी आजही आपली विश्वासर्हता टिकवून ठेवली असल्याची प्रांजळ कबुली भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पंचायत समिती सभागृहात पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी : आमदार
भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे शहरातील वृत्तपत्र विक्रेता, एजंट, पत्रकार, छायाचित्रकार तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्या रणरागिणींचा गुरुवारी सन्मान करण्यात आल. यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की,
समाज जागृतीसाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. अधिक जागरूक राहून जबाबदारीपूर्वक कार्य करा, चांगली पिढी व सक्षम समाज घडविण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी, असे आवाहन त्यांनी केले.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर गटविकास अधिकारी विलास भटकर, पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड.नितीन खरे, भुसावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील, रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, शहराध्यक्ष प्रेम परदेशी आदींची उपस्थिती होती.
अॅड.नितीन खरे यांचा मानपत्राने सत्कार
गेल्या 32 वर्षांपासून वकीली व्यवसायात असलेले तसेच 14 वर्षांपासून सरकारी वकील म्हणून काम पाहत असलेल्या अॅड.नितीन खरे यांनी पत्रकारीता, वकीली व्यवसाय व सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ उत्कृष्ट काम लक्षात घेता शहर पत्रकार संस्थेतर्फे ‘विशेष मानपत्र’ देऊन आमदारांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. मानपत्राचे शब्दांकन डॉ.जगदीश पाटील यांनी केले. मानपत्राचे वाचन राजेश पोतदार यांनी केले.
निस्वार्थ भावनेने हवी पत्रकारीता : अॅड.नितीन खरे
अॅड.नितीन खरे म्हणाले की, निस्वार्थ भावनेने व सकारात्मक वृत्तीने वृत्तांकन करावे. कुणाचीही हेतू पुरस्सर बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी व सत्यता पडताळूनच बातमी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी श्रीकांत जोशी, अॅड.तुषार पाटील, अॅड.जास्वंदी भंडारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
विविध पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान
पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार, समाजकार्य पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार देवून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच समाजात उत्कृष्ट कार्य करणार्या महिलांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट पत्रकार व छायाचित्रकार पुरस्कार वासेफ पटेल, चेतन चौधरी, विकास चव्हाण, सलाउद्दीन आदीब, राकेश कोल्हे, सुनील सूर्यवंशी, इम्तियाज शेख, खुशाल नागपूरे, मंगेश जोशी, सद्दाम खाटीक, विशाल सुर्यवंशी, कलिम पायलट, हिरालाल महाजन, विनोद ठाकरे, फिरोज तडवी यांना देण्यात आला.
यांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ.सुवर्णा गाडेकर, डॉ.वंदना वाघचौरे, चिल्ड्रन कॉन्सीलर आरती चौधरी, पत्रकार उज्वला बागुल, महिला समुपदेशक भारती म्हस्के-रंधे, राजेश्री सुरवाडे, वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबल विजया सपकाळे, राजेश्री नेवे, अॅड.जास्वंदी भंडारी, संगीता भामरे, प्रा.सीमा भारंबे, भारती वैष्णव, डॉ.किर्ती फलटणकर, प्रा.राजश्री देशमुख, कविता मेहेरे, ज्योेती डिगंबर पाटील यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले.
एजंटांसह पत्रकारांचाही सन्मान
कार्यक्रमात वृत्तपत्र एजंट श्रीकांत कुळकर्णी, अजय वाणी, शिरीष जोशी, सबदर अली, वृत्तपत्र विक्रेता अध्यक्ष दिनेश पखीड्डे यांचा सन्मान करण्यात आला तसेच कोरोना योद्धा पुरस्काराने नगरसेवक युवराज लोणारी, रेल्वेचे राजशिष्टाचार अधिकारी जीवन चौधरी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राध्येशाम लाहोटी, अरुण बैसे, गौसीया नगर यंग गु्रप, पंचायत समितीचे राजेंद्र फेगडे तसेच कोरोना योध्दा पत्रकार पुरस्कार भुसावळ जनशक्तीचे विभागीय कार्यालय प्रमुख गणेश रामकृष्ण वाघ, पत्रकार श्रीकांत सराफ (दिव्य मराठी), आशिष पाटील (देशदूत), शाम गोविंदा (लोकमत), वसंत कोलते (देशोन्नती), अनिल सोनवणे, संजय काशिव, अभिजीत आढाव, राजेश तायडे, राजेश पोतदार, कैलास उपाध्याय, भूषण आंबोडकर, कमलेश चौधरी, कालु शहा, इकबाल खान, वसीम शेख, रमेश खंडारे,निलेश फिरके, संतोष शेलोडे, सुनील आराक, गोपी म्याँद्रे, सतीश कांबळे, विनोद गोरधे, आकाश ढाके, मयुर निंभोरे, शकिल पटेल, राजू चौधरी, अखिलेश धिमणे, प्रशांत बोरोले, शंतनु गचके, हर्षल पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी यांचे परीश्रम मोलाचे
प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रेम परदेशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.राजेश्री देशमुख, व प्रकाश लोडते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष आशिष पाटील व गणेश वाघ, सचिव हबीब चव्हाण, कोषाध्यक्ष उज्वला बागुल, सहसचिव राजेश तायडे, राकेश कोल्हे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.

