दहा वर्षांचे कॅलेंडर ! ते ही एकाच पानात

भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांचा उपक्रम


भुसावळ : भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी सन 2015 ते सन 2025 पर्यंत दहा वर्षाची दिनदर्शिका केवळ एका पानात साकारण्याची किमया केली आहे. काही वर्षांची दिनदर्शिका देखील काही कारणास्तव आपणास हवी असते, अश्या वेळी ही गरज सहज भागवता येणार आहे शिवाय पुढील काही नियोजन करण्यासाठी आगामी काही वर्षांची सुद्धा आवश्यकता भासल्यास त्या माध्यमातून सोय होणार आहे. खिशात, पाकिटात ठेवता येणारी ही दिनदर्शिका असून सहज कोठेही हाताळता येणार आहे. पान उलट करण्याचीदेखील नागरीकांना गरज पडणार नाही. दलाल सर हे नेहमीच अशी दिनदर्शिका नेहमीच तयार करतात. त्यासाठी साध्या गणिताची आवश्यकता असते केवळ लीप वर्ष असेल तर विशेष काळजीपूर्वक फेब्रुवारीची काळजी घ्यावी लागते. एरवी ही तयार करायला अगदी सोपी असल्याची भावना दलाल यांनी व्यक्त केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !