मुक्ताईनगर शहरात पत्रकार दिनानिमित्त लसीकरण शिबिर
मुक्ताईनगर : तालुका पत्रकार संघटनेतर्फे मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात पत्रकार दिनाचे औचित्य साधत 15 ते 18 व त्यावरील सर्वच वयोगटातील नागरीकांसाठी लसीकरणाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात 205 जणांना लसीकरण करण्यात आले. उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमितकुमार घडेकर, डॉ.देशमुख, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, संत मुक्ताई संस्थानचे व्यवस्थापक हभप उद्धव जुनारे महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे, शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे, तालुका वैद्यकीय कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक अर्जुन काळे, व्ही.एस.पाटील, प्रदीप काळे, आरोग्य परीचारीका ज्योती खरे, रीतेश गवई, संजय माळी, व्ही.डी.पाटील, अॅड.राहुल पाटील, गणेश टोंगे, विशाल पाटील, हर्षाली महाजन, निलेश भालेराव आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
पत्रकारांसह मान्यवरांनी लावली हजेरी
याप्रसंगी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद बोदडे, उपाध्यक्ष विनायक वाडेकर, सचिव संदीप जोगी, पत्रकार मतीन शेख, मोहन मेढे, मुकेश महल्ले, छबीलदास पाटील, अमोल वैद्य, रवी गोरे, दीपक चौधरी, आतीक खान, प्रमोद सौंदळे, पंकज कपले, अक्षय काठोके, पंकज तायडे, विठ्ठल धनगर, नगरसेवक संतोष मराठे, राजेश चौधरी, राजेश पाटील, एम.के.पाटील, नितीन कासार, सतीश गायकवाड, देवेंद्र काटे, प्रवीण भोई, संजय वाडीले आदी उपस्थित होते.


