खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानतर्फे पत्रकारांचा सन्मान


खिर्डी : खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण संस्थांनतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुजीत कपाटे, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उन्नवणे, रावेर पंचायत समितीच्या सभापती कविता हरीलाल कोळी, खिर्डी खुर्द उपसरपंच पुष्पा पाटील, श्रीकृष्ण मंदिर संस्थानचे गादिपती आचार्य नरेंद्र महाराज उर्फ मोठेबाबा, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी, पत्रकार राजीव बोरसे व मान्यवर उपस्थित होते. आयोजक प्रदीप महाराज पंजाबी तर सूत्रसंचालन कुरकुरे यांनी तसेच आभार प्रा.दिलीप सोनवणे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !