जाडगावसह मन्यारखेड्यात अपक्ष उमेदवार सतीश घुलेंनी साधला मतदारांशी संवाद
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी गुरुवार, 17 रोजी दुपारी तालुक्यातील जाडगावसह मन्यारखेडा गावाला भेट देत मतदारांशी
संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मतदारांशी हितगुज करीत त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. सकाळी 11 वाजेपासून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ त्यांच्या रॅलीत सहभागी झाले. दुपारनंतर तालुक्यातील दीपनगर, बोहर्डी बु॥ व खुर्द तसेच कुर्हा, साक्री आदी भागात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधणार असल्याचे घुले यांनी सांगितले.
परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी मतदारांशी संवाद साधतांना सांगत आहेत.

