भुसावळातील प्रभाग 13 मध्ये उद्या आमदार संजय सावकारेंची प्रचार रॅली


भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे हे शुक्रवारी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचार रॅली काढणार आहेत. प्रभाग क्रमांक 13, गांधी नगरातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या घरापासून शेकडो कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपा पदाधिकार्‍यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !