कानळदा येथील तरूणाची आत्महत्या


जळगाव- कानळदा येथील गणेश उर्फ सागर समाधान सपकाळे (19) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे. गणेश हा गेल्या काही दिवसांपासून बांभोरी येथील कंपनीत कंत्राटी म्हणून कामाला होता. दरम्यान तो शुक्रवारी कामाला गेलेला नव्हता. त्याचे वडील समाधान सपकाळे व आई ज्योती हे शेतात कामासाठी गेले होते. तर लहान भाऊ मयुर हा देखील बाहेर गेला होता. त्यामुळे गणेश हा घरी एकटाच होता. त्याने राहत्या घरात स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याचवेळी गणेश याच्या मित्राचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला ही घटना दिसून आली. घटनेची माहिती दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.


कॉपी करू नका.