समाज प्रबोधनाची माध्यमांकडून अपेक्षा : प्रा.नितीन मटकरी
सावदा : लोकसभा, न्यायपालिका, नोकरशाही यांच्यावर अंकुश ठेवण्यात माध्यमांची मोठी भूमिका असून पत्रकारांनी समाज प्रबोधनपर जनजागृती करावी, असे आवाहन प्रा.नितीन मटकर (जळगाव) यांनी येथे केले. ज्येष्ठ पत्रकार शांताताई शेळके यांची जन्मशताब्दी वर्ष आणि पत्रकार कै.कैलाससिंग परदेशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ओरीजनल पत्रकार संघ, सावदा यांनी प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालयात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयातील प्रमुख वैशाली दीदी होत्या. उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी कैलास कडलग तर प्रमुख अतिथी म्हणून सावदा पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक देविदास इंगोले, प्रा.नितीन मटकरी होते. प्रास्ताविक पत्रकार दीपक श्रावगे यांनी केले. कोरोना काळात वैद्यकीय व समाजसेवी लोकांनी जनतेस केलेली मदत व सहकार्य करणार्या हाजी शब्बीर हुसैन अख्तर हुसैन बौहरी ऊर्फ बाबूशेठ, नगरसेवक फिरोज खान हबीबुल्ला खान, डायमंड इंग्लिश मीडियम शाळेचे चेअरमन हाजी हारुन शेख इक्बाल, सिटी हॉस्पिटलचे डॉ.अन्सार खान, गुलाम गौस खान, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार भानुदास भारंबे, पत्रकार दीपक श्रावगे यांचे शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र प्रदान करून मान्यवरांनी सन्मान केला. आमदारांचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या तुषार बोरसे यांचा सत्कार करण्यात आला..
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास ओरीजनल पत्रकार संघ सावदाचे अध्यक्ष युसूफ शाह, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सदस्य व दिलीप चांदेलकर, प्रदीप कलकर्णी, संतोष परदेशी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरज परदेशी, शरद भारंबे, दुर्गा केबलचे संचालक किशोर परदेशी, अजमल खासाब, गजू ठोसरे, सुनील चोपडे, राजेश चौधरी, शिवसेना शाखाप्रमुख इरफान मिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन सकळकळेव फरीद शेख यांनी केले. कार्यक्रमात कोरोना काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्यांचा सत्कार करण्यात आला यशस्वीतेसाठी ओरीजनल पत्रकार संघटना, सावदा व प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयातील सर्वांनी परीश्रम घेतले.


