सावद्यात नवीन पालिका सभागृहाचे अखेर स्व.प्रभाकर महाजन नामकरण


सावदा : शहरातील कोचुर रोडवर असलेल्या पालिकेच्या जुन्या सभागृहाशेजारी नवीन सभागृह बांधण्यात आल्यानंतर या सभागृहाला नगरसेवक राजेश वानखेडे यांनी तत्कालीन नगरसेवक ज्यांनी हे सभागृह बांधण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे नाव अर्थात स्व.प्रभाकर बुला महाजन यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर ही मागणी मान्य झाली व नुकतेच या सभागृहावर सावदा पालिकेचे स्व. प्रभाकर बुला महाजन बहुउद्देशीय सभागृह असा फलक लावण्यात आला आहे. नगरसेवक राजेश वानखेडे यांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे शिवाय यातून येथील लेवा पाटील समाजास एक सन्मान या नामफलकाव्दारे मिळाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !