मुक्ताईनगरात अनोळखीचा मृतदेह आढळला


मुक्ताईनगर : बोदवड रस्त्यावरील नवीन मुक्ताबाई मंदिराच्या मागे 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. कोथळी गावचे पोलिस पाटील संजय चौधरी यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रावण जवरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !