बोदवड नगरपंचायत निवडणूक : माघारीच्या दिवशी आठ उमेदवारांची माघार
बोदवड : बोदवड नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवार, 18 जानेवारी निवडणूक होत असून माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 दाखल अर्जांपैकी आठ अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर निवडणूक रींगणात आता 15 उमेदवार असणार आहेत.
या उमेदवारांनी घेतली माघार
प्रभाग क्रमांक दोनमधून चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यात संजय पंजाबराव पाटील, अश्विनी विजयकुमार चौधरी, संदीप अशोक तायडे, जीवन कैलास बिजार तर प्रभाग 15 मधून सपना राजेश नानावणी, पूनम निलेश माळी, सचिन सुरेश भोई तसेच प्रभाग क्रमांक 17 मधून रुपाली योगेश माळी यांनी माघार घेतली. काही उमेदवारांनी दोन अर्ज भरल्याने ते मागे घेण्यात आले. दरम्यान, चार प्रभागातील आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता चार जागांसाठी 15 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.


