चाळीसगाव शहरात जेसीआय सिटीचे थाटात पदग्रहण
तुमच्यात जर सकारात्मकता असेल तर कोणीही तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून थांबवू शकत नाही : अॅड.मोहनजी शुक्ला
चाळीसगाव : तुमच्यात जर सकारात्मकता असेल तर कुणीही तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन एरंडोल येथील अॅड.मोहनजी शुक्ला यांनी चाळीसगाव जेसीआय सिटीच्या पदग्रहण समारंभावेळी केले. चाळीसगाव जेसीआय सिटीचा पदग्रहण समारंभ बुधवारी सायंकाळी सात वाजता हॉटेल रीलायबल खान्देशी कट्टा येथे झाला. यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून एरंडोलच्या औदुंबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष, अॅड.मोहनजी शुक्ला, पाचोरा येथील जेसी एचजीएफ मयूर दायमा, झोन उपाध्यक्ष, जेसीआय झोन 13 व चाळीसगाव जेसीआय सिटीचे माजी अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी-संगमचे अध्यक्ष बालाप्रसाद राणा उपस्थित होते. व्यासपीठावर आयपीपी 2021 मुराद पटेल, अध्यक्ष – 2021 डॉ. प्रसन्न अहिरे, सचिव दिनेश चव्हाण, विद्यमान अध्यक्ष धर्मराज खैरनार उपस्थित होते. अॅड. शुक्ला यांनी आपल्या मनोगतातून जेसीआयच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली व संपूर्ण जेसीआय टिमला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. प्रमुख अतिथी मयूरजी दायमा यांनी जेसीआय या संस्थेबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. नंतर डॉ. प्रसन्न अहिरे यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. पुढे सर्व मान्यवरांसमोर डॉ. प्रसन्न अहिरे यांनी धर्मराज खैरनार यांना कॉलर व पिन देवून जेसीआय 2022 सालचा अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला तसेच सचिन दिनेश चव्हाण यांनी विद्यमान सचिव मयूर अमृतकार यांनी सचिवपदाची पिन लावून 2022 या सालचा जेसीआयचा सचिवपदाचा पदभार सोपविला. जेसीआय या संस्थेत नूतन सदस्य मनोज पाटील, मंगेश जोशी, नरेंद्र शिरुडे, वकार बेग, योगेश्वर राठोड, आतिश कदम, चंद्रकांत ठाकरे, जगन्नाथ चिंचोले, सलमान खान, सुनिल गायकवाड, दीपक खैरनार यांचे मयूर दायमा यांनी स्वागत करुन यावेळी त्यांचा जेसीआयच्या सदस्यपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष धर्मराज खैरनार यांनी झालेल्या उपक्रमांविषयी माहिती देवून पुढील उपक्रमांचे नियोजन सांगितले.




यांनी कार्यक्रमास लावली हजेरी
समारंभास जेसीआयचे माजी अध्यक्ष निलेश गुप्ता, संजय पवार, राजेंद्र छाजेड, सुनिल बंग, सचिन पवार, खुशाल पाटील, अफसर खाटीक, प्रितेश कटारीया, गजानन मोरे, बालाप्रसाद राणा, हरेश जैन, रविंद्र शिरुडे, माजी नायब तहसिलदार देविदासजी खैरनार, साप्ता. चाळीसगाव परिसरचे संपादक रविंद्र अमृतकार, बापूसाहेब खैरनार, दिनकर खैरनार, कमलेश पवार, सदायीव खैरनार, कांतीलाल ठाकरे, विनोद कोठावदे, देवेश पवार उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशुतोष खैरनार, अॅड.शैलेंद्र पाटील, अॅड.सागर पाटील, जगदिश पटेल, साहिल दाभाडे, कुणाल राणा, सुवालाल सुर्यवंशी, महेंद्र कुमावत यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन गजानन मोरे यांनी केले तर आभार सचिव मयूर अमृतकार यांनी मानले.
