मास्क न लावणार्‍या दाम्पत्याची पोलिसांशी हुज्जत : जळगावात दोघांविरोधात गुन्हा


जळगाव : मास्क न लावणार्‍या दाम्पत्यावर कारवाई करणार्‍या पोलिसांवर दाम्पत्याने दमदाटी करीत विविध आरोप करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने दोघांविरोधात जळगाव शहर पोलिसात (Jalgaon City Police) गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस पथकालाच केली दमदाटी
जळगाव शहर पोलिस ठाण्याचे (Jalgaon City Police) पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार समशेर तडवी, पोलिस हेड कॉन्स्टेबल आनंदा राठोड, ललित भदाणे, महिला पोलीस कर्मचारी अलका वानखेडे, पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे हे शुक्रवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शहरातील टॉवर चौक येथे विना मास्क फिरणार्‍या नागरीकांवर कारवाईसाठी उभे असताना दुचाकी (एम.एच.19 बी.डब्ल्यू.8202) वरून नारायण प्रकाश जगताप (36) (Narayan Prakash Jagtap) व त्यांची पत्नी दीपाली नारायण जगताप (30, रा.खोटे नगर, जळगाव) (Dipali Narayan Jagtap) हे विना मास्क शहरात फिरत असताना पोलिसांनी दुचाकी अडवून दंड देऊ केला मात्र महिला दीपाली जगताप यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्यावर आर्थिक आरोप करीत दमदाटी केली. या प्रकरणी पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी नारायण प्रकाश जगताप व त्यांची पत्नी दीपाली नारायण जगताप यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात (Jalgaon City Police) सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !