जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण
जळगाव : जळगावचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांंना करोनाची लागण झाल्याने राजकीय (Political) वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील (Gulabrab Patil) स्वत: ट्वीट (Twit) करून ही माहिती दिली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण
ठाकरे सरकारमधील 25 हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळं लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, नितीन राऊत, सुनील केदार, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, अनिल परब, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ यांच्यासह काही राज्यमंत्र्यांना करोनाची लागण झाली तर आता गुलाबराव पाटील (Gulabrab Patil) यांची भर पडली आहे.




संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन
दरम्यान, गुलाबराव पाटील (Gulabrab Patil) यांनी गुरुवारी रात्री ट्वीट (Twit) करून कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील (Gulabrab Patil) यांनी ट्वीटच्या (Twit) माध्यमातून केले आहे.
