भुसावळातील अपक्ष उमेदवार सतीश घुलेंचा ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी शुक्रवारी सकाळी भुसावळातील रेल्वे विभागातील नागरीक तसेच कर्मचार्यांशी संवाद साधला. प्रसंगी त्यांनी मतदारांच्या अडी-अडचणी जाणून घेत परीवर्तनासाठी आपली उमेदवारी असल्याचे चर्चेदरम्यान सांगितले. दरम्यान, शुक्रवारी दुपारून तालुक्यातील पिंप्रीसेकम, दीपनगर, वरणगाव फॅक्टरी, कंडारी गावात प्रचार फेरी काढण्याचे नियोजन केले आहे.
परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी मतदारांशी संवाद साधतांना सांगत आहेत.



