चाळीसगावात जुन्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण


चाळीसगाव : शहरातील सुभाष कॉम्प्लेक्ससमोर हातगाडीवर उभ्या असलेल्या जुना वाद उकरून एकाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीमुळे वृद्धाचा हात फ्रॅक्चर
चाळीसगाव शहरातील हरीओम नगरातील पंडित झिंगा चौधरी (70) हे वयोवृद्ध गुरुवार, 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुभाष कॉम्प्लेक्स समोर हातगाडीवर बसले असताना संशयीत गौतम दिलीप मोरे (रा.हरीओम नगर, चाळीसगाव) हा आला व त्याने जुना वाद उकरून काढत चौधरी यांना शिविगाळ करून चापट-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर गौतम मोरे यांनी वृद्धाला उचलून रोडावर फेकले. त्यात पंडित चौधरी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मार लागून फ्रॅक्चर झाला. यात पंडित चौधरी यांना जबर दुखापत झाली. या प्रकरणी पंडित चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गौतम दिलीप मोरेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक भगवान उमाळे करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !