जळगावात बंद घर फोडले : 55 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला


जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंवर नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली. ही घटना शनिवार, 15 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार हरीष खियलदास रावलानी (55, रा.कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांचे जळगाव शहरातील बळीरामपेठेत कपड्यांचे दुकान आहे. नुकतेच रावलानी यांनी गणपती नगरातील साकार अपार्टमेंट येथे नवीन फ्लॅट घेतला असल्याने जुन्या घरातून नवीन घरात सामान टाकण्याचे काम सुरू होते. सोमवार, 10 जानेवारी रोजी त्यांनी काही सामान शिफ्ट केले होते. त्यानंतर 11 वाजता कंवर नगरातील घराला कुलूप लावून ते गणपती नगरातील घरी गेले. त्यानंतर शनिवारी 15 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता सिंधी कॉलनीजवळील कंवरनगरातील जुन्या घरी गेले असता त्यांना घरात दरावाजाचे कुलूप तोडलेले दिसून अले. आत जावून पाहिले असता त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आला.





55 हजारांच्या ऐवजावर डल्ला
लोखंडी कापटातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि 3 हजार रुपयांची रोकड असा एकूण 54 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी हरीष रावलानी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रत्ताप शिकारे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व योगेश बारी करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !