भुसावळातील प्रभाग 13 मध्ये फटाक्यांची आतषबाजी व पदाधिकार्‍यांचे औक्षण करून भाजपाच्या प्रचार रॅलीचे स्वागत


भुसावळ : विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना, रीपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचार रॅली काढली. प्रसंगी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी ठिकठिकाणी पदाधिकार्‍यांचे औक्षणही करून त्यांना आशीर्वाद देण्यात आले.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
या रॅलीत भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, किरण कोलते, मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे गुड्डू अग्रवाल, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे गडकरी नगर परीरातही शुक्रवारी सकाळी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे व शिवसेना माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या नेतृत्वात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये प्रमोद सावकारे, नगरसेवक मनोज बियाणी, पिंटू (निर्मल) कोठारी, युवराज लोणारी, रामदास सावकारे, गुड्डू अग्रवाल, संजय आवटे, पराग भोळे, शिवसेनेचे माजी शहर उपप्रमुख हेमंत खंबायत, वांजोळा माजी सरपंच नरेंद्र पाटील, नगरसेवक अमोल इंगळे, अनिल लाहोटी, सुभाष पेंढारकर, प्रेम आवटे, रतन झांबरे, रवी लेकुरवाळे, कौतीकपाटील, अनिकेत पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैलेजा पाटील, अलका शेळके, नगरसेविका मंगल आवटे, मयुरी पाटील यांच्यासह शेकडो नागरी सहभागी झाले. विविध ठिकाणी भाजपा-शिवसेना आरपीआय, रासप, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परीसरातील मतदारांशी संवाद साधला. फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार सावकारे यांचे ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले तर महिलांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !