भुसावळात कोरोना रुग्ण संख्या शंभरीपार तर जळगाव जिल्ह्यात आढळले 354 रुग्ण


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत असून भुसावळात तर सलग पाच दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात रविवार, 16 जानेवारी एकाच दिवसात तब्बल 354 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

आतापर्यंत 2580 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 45 हजार 159 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 458 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. रविवारी 79 रुग्णांनी कोरोनावर मात केली.





या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 108
जळगाव ग्रामीण 12
भुसावळ 132
अमळनेर 19
चोपडा 19
पाचोरा 00
भडगाव 03
धरणगाव 00
यावल 02
एरंडोल 04
जामनेर 10
रावेर 06
पारोळा 12
चाळीसगाव 14
मुक्ताईनगर 06
बोदवड 07
अन्य जिल्हा 00

भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्‍या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !