बोदवडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार


बोदवड : रस्त्याने पायी चालणार्‍या अपंग पादचार्‍यास पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधारे वाहनाने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची गुरुवारी रात्री नऊ वाजता बसस्थानकासमोर घडली. या अपघातात प्रभाकर (बंडू) वासुदेव पाटील (35, रा.चावळदा, ता.मोताळा) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला. मृतदेहाचे बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुरुवातीला अनोळखी असणार्‍या या इसमाची नंतर त्यांचे नातेवाईक चेतन पडार (बोदवड) यांनी ओळख पटली. दरम्यान, बोदवड पोलिसात या प्रकरणी अद्याप अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध भादंवि 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !