गोपीचंद पडळकरांना नाकारले : खानापूर नगरपंचायतीत भाजपला भोपळा


मुंबई : एकीकडे सांगलीच्या कवठे महाकाळ नगर पंचायतीवर दिवंगत आर. आर. पाटील याचा मुलगा रोहित पाटीलने (Rohit Patil) एकहाती सत्ता मिळवली आहे. तर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही. खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबर यांच्या खांद्यावर देण्यात आलं होत तर भाजपची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर होती मात्र या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

पडळकरांवर राष्ट्रवादीची टोलेबाजी
आमदार गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबातील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करताना पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्या टीकेनं वादही निर्माण होतो. आपल्या टीकेमुळं आणि पवारा कुटुंबावर चढवलेल्या हल्ल्यामुळे पडळकर नेहमीच चर्चेत असतात. अशावेळी खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळाही फोडता न आल्यानं पडळकरांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टोलेबाजी करण्यात येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !