कवठे महाकाळ नगर पंचायतीवर रोहित पाटलांनी मिळवला एकहाती विजय


मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगलीच्या कवठे महाकाळ नगर पंचायतीवर दिवंगत आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलने (Rohit Patil) एकहाती सत्ता मिळवली आहे

रोहित पाटलांनी एकहाती विजय मिळवला
अवघ्या 23 वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठे महाकाळ नगर पंचायत निवडणुकीत एकहाती विजय मिळवला आहे. या ठिकाणी रोहित पवार विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी असं चित्र होते मात्र रोहित पाटील यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत.



वडिलांना खरंच मीस करतोय
या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय. आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

जनतेचा निर्णय मान्य असेल
आमदारकीसाठी विधानसभेची निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर रोहित पाटील यांनी स्पष्ट आणि सूचक उत्तर दिलं आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकहितासाठी या मतदारसंघामध्ये काम करत आहोत. त्यामुळे लोक जो निर्णय घेतील तो शेवटपर्यंत आम्हाला मान्य असेल. तसेच विधानसभेच्या निवडणुकीबाबच म्हणाल तर जर पक्षाने जबाबदारी दिली तर लोकहिताच्या दृष्टीने तसा निर्णय घ्यायला काही हरकत नाही, असे रोहित पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !