भुसावळात शाळा परीसरात गुटखा विक्री : पाच विक्रेत्यांविरोधात गुन्हे


भुसावळ : भुसावळ शहरातील शाळांच्या 100 मीटरच्या आत गुटखा, तंंबाखुजन्य पदार्थ विक्री करणार्‍या तीन विक्रेत्यांविरूध्द बाजारपेठ पोलिसात तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित दोन ठीकाणी छापे टाकून पोलिसांनी 17 हजार 572 रूपयांचा गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले. पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान कारवाई करीत पाचही विक्रेत्यांकडून गुटखा जप्त केला. पाचही विक्रेत्याविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बंदी असलेला गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शाळांच्या परीसरातील गुटखा विक्री रडारवर
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील विविध शाळांपासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा, तंबाखु, सुगंधी सुपारी असे सरकारने बंदी केलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीच्या पोलिस कर्मचार्‍यांनी शहरातील विविध शाळांच्या बाहेर उभ्या राहात असलेल्या गुटखा, तंबाखु, सुगंधी सुपारी यांच्या विरूध्द विशेष मोहिम राबवित गुटखा मोठ्या प्रमाणावर जप्त केला. यात नाहाटा चौफुली जवळ शेखर राजेद्र वाणी यांच्याकडे 5 हजार 449 रूपयांचा माल जप्त केला.याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अतुल कुमावत या पोलिस कर्मचार्‍यांने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मामाजी टॉकीज मार्गावर कारवाई
शडरातील मामाजी टॉकीज रोडवरील घासीलाल वडेवाल्याच्या बाजूला तुलसीदास मार्केटमधील ओमसार्स ट्रेडर्स येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे कारवाई करीत 8 हजार 600 रूपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजता केली आहे.

म्युन्सीपल हायस्कूलजवळ कारवाई
शहरातील जामनेर रोडवरील मुन्सीपल हायस्कूलजवळ मामा पान कॉर्नर येथे पोलिसांनी गुरसवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई करीत तेथून 2 हजार 873 रूपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी लिलाधर भारंबे यांच्या विरूध्द पोलिस कर्मचारी योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाख केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिन्ही कारवाईत 16 हजार 922 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई
शहर पोलिसांनी सेंट अलॉयसीस शाळेपासून 50 मीटर अंतरावर एका विक्रेत्याकडून 350 रूपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला. शहर पोलिस ठाण्यातील जाकीर मन्सु्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल चुडामण भोई (रा.झेडटीएस, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर हारून मन्सुरी यांनी पुन्हा याच परिसरात कारवाई केली आहे , यात रूपेश हुसळे यांच्याकडीून 300 रूपयांचा गुटखा व अन्य पुड्या जप्त केल्या आहे. त्यांच्या विरध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार मोहंमद अली सैय्यद हे पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !