भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयातील कबड्डी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील कबड्डी खेळाडू प्रतीक संजय अवसरमल, भरत वराडे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर विभागीय कबड्डी स्पर्धा शहादा, नंदुरबारसाठी निवड झाली.
या खेळाडूंनी मिळवले यश
जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने एम.जे.कॉलेज जळगाव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, यांचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. तृतीय क्रमांकासाठी नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचा पराभव करून भोळे महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला.






या स्पर्धेत प्रतीक संजय अवसरमल, भरत वराडे यांचा खेळ उत्कृष्ट झाला त्यामुळे जळगाव विभाग कबड्डी संघात निवड झाल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके उपस्थित होते. खेळाडूंना प्रकाश सावळे, प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.