सुखद वार्ता ; सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोडा ‘ओव्हर फ्लो’


रावेर- तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुकी, मंगरुळ, मात्राण व आभोडा धरण शंभर टक्के भरल्याने शेतकरी सुखावले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही धरणे फुल्ल भरल्यानंतर सांडव्यावरून सुमारे दोन फुटांनी वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे. रावेर तालुक्यासह आदिवासी भागात पावसाची संततधार दोन दिवसांपासून सुरू आहे तर आदिवासी भागासह मध्यप्रदेशातदेचील मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.


कॉपी करू नका.